शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

शाब्बास बहाद्दूरांनो... रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट करत केले महिलेचे प्राण वाचविणाऱ्या जवानांचे कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 20:39 IST

दोन दिवसांपूर्वीच कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलेचा जीव थोडक्यात बचावला होता 

मुंबई - मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर लोकलमधून उतरत असलेल्या महिलेसोबत दोन दिवसांपूर्वी एक विचित्र अपघात झाला. महिलेचा पदर लोकलच्या दरवाज्यातील हुकात अडकून ही महिला फलाटावर पडली आणि गाडी सुरु झाल्यानंतर फरफटत गाडी खाली जाणार तितक्यात आरपीएफ कॉन्स्टेबल राज कमल यादव आणि सुमितकुमार यादव यांनी त्या महिलेचा जीव वाचवला. आरपीएफ कॉन्स्टेबल राजकमल यादव आणि सुमितकुमार यादव यांनी केलेल्या धाडसाची आणि मदतीची दखल मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी कॉन्स्टेबलच्या सतर्कतेबद्दल त्यांचा सत्कार केला आहे. रोख रक्कम ५ हजार आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना बुधवारी सन्मानित करण्यात आले. तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्विट करुन कौतुकाची थाप दिली आहे. 

मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग स्थानकात मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला. या अपघाताचे दृश्य स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये चित्तथरारक दृश्य कैद झाले आहे. पूनम चेतन कालसानी नावाची महिला गाडीतून उतरत असताना तिचा पदर दरवाज्यात अडकला. त्याचवेळी गाडी सुरू झाली आणि महिला गाडीसोबत फरफटत गेली. महिला अक्षरशः गाडीखाली गेली असती. पण, स्थानकावर तैनात असलेले आरपीएफ जवान राजकमल यादव, सुमितकुमार यादव यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. तिचा जीव वाचवताना ते स्वतःही पडले. पण ते त्वरीत उठले आणि महिलेचे प्राण वाचवले. या घटनेत महिलेचे प्राण वाचले असून महिलेसह दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत. 

 

नेमके काय घडले होते त्या दिवशी? जाणून घेण्यासाठी वाचा 

http://www.lokmat.com/crime/two-rpf-jawans-survived-lady/

 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयलPoliceपोलिस