प्रेमप्रकरणातून लग्नाच्या दिवशीच मुलीच्या भावावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 15:42 IST2018-12-28T15:41:15+5:302018-12-28T15:42:52+5:30
या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंब्रा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्रेमप्रकरणातून लग्नाच्या दिवशीच मुलीच्या भावावर हल्ला
ठाणे - काही दिवसांपासून मुलीचा पाठलाग करणाऱ्या चेतन लाड (३१) या आरोपीने मुलीचा भाऊ आणि तिच्या काकूवर हत्याराने हल्ला केल्याची घटना दिव्यात घडली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंब्रापोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बुधवारी या मुलीचे लग्न होते. मुलीचा ३० वर्षांचा भाऊ तसेच इतर नातेवाईक सकाळी चुनाभट्टीला लग्नासाठी निघाले होते. दिवा स्टेशन रोडवर अचानक पाठीमागून आलेल्या आरोपीने तू तुझ्या बहिणीचे लग्न दुसऱ्याबरोबर कसे करतोस, असे म्हणत शिवीगाळ केली. नंतर हत्याराने हल्ला केला. मुलीच्या ६० वर्षांच्या काकीने आरोपीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने तिलाही हत्याराने मारले. नंतर आरोपी पळून गेला. आरोपी हा पेट्रोलपंपावर काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे आरोपी हा पूर्वी मुलगी राहत असलेल्या इमारतीमध्येच राहत होता.