भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्याने कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 17:04 IST2019-07-26T17:03:19+5:302019-07-26T17:04:59+5:30

भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून दोघांवर कोयत्याने वार केले.

weapon attacking due to asking for money to eat Bhaji | भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्याने कोयत्याने वार

भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्याने कोयत्याने वार

पिंपरी : भजी खाल्ल्याचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून दोघांवर कोयत्याने वार केले. पिंपळे सौदागर येथे बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एक आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष काटे, आतू शेख, महेश जगताप व सलीम पापा शेख असे आरोपींची नावे आहेत. यातील महेश जगताप या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राहुल प्रसाद झेंडे (वय ३६, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. 
फिर्यादी राहुल झेंडे यांचे नाश्त्याचे सेंटर आहे. तेथे आरोपींनी भजी खाल्ली. त्याचे पैसे मागितल्याचा आरोपींना राग आला. त्यामुळे त्यांनी फियार्दी राहुल झेंडे यांच्या घरी जाऊन लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच लोखंडी कोयत्याने वार केले. त्यांना थांबविण्यासाठी गेलेल्या मौलाना शेख यांनाही लाकडी दांडक्याने वार करून लोखंडी कोयत्याने वार करून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: weapon attacking due to asking for money to eat Bhaji