वाझेंचा मोबाइल, आयपॅडही जप्त; आठ तास झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:00 IST2021-03-17T02:26:47+5:302021-03-17T07:00:37+5:30
मुंबई क्राइम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत आठ तास ही कारवाई सुरू होती. स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ वाझेनीच पार्क केल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आले आहे.

वाझेंचा मोबाइल, आयपॅडही जप्त; आठ तास झाडाझडती
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्फोटक कारच्या तपासाच्या अनुषंगाने मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागाची झाडाझडती घेतली, तर सचिन वाझे यांच्या घरातून मोबाइल व आयपॅड जप्त केले. त्यातून गुन्ह्यातील त्यांच्या सहभागाचे पुरावे उपलब्ध हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Waze's mobile, iPad confiscated, eight hours of harassment)
मुंबई क्राइम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत आठ तास ही कारवाई सुरू होती. स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ वाझेनीच पार्क केल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा व शासकीय यंत्रणेचा वापर व पदाचा दुरुपयोग केल्याबद्दलचे तांत्रिक पुरावे जमविण्याचे काम एक पथक करीत आहे. सोमवारी त्यांच्या घरातून मोबाइल व आयपॅड जप्त केला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास सीआययूच्या कार्यालयातून तपासाचे पेपर, संगणक, सीडी ड्राइव्ह व अन्य वस्तूंची तपासणी करून गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक डाटा जप्त केला.