शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

व्यापम घोटाळा : ३० दोषी आरोपींना ७ वर्ष तर एकाला १० वर्षांचा कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 4:51 PM

न्यायालयाने केला निकाल जाहीर

ठळक मुद्देया घोटाळ्याचा सूत्रधार प्रदीप त्यागीला १० वर्षांचा कारावास तर उर्वरित ३० आरोपींना ७ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.२०१३ मध्ये या घोटाळ्याला वाचा फुटली. २०१३ मधील व्यापम पोलीस भरती प्रकरणातील विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व 31 आरोपींना २१ नोव्हेंबरला दोषी ठरवले.

मध्य प्रदेश  - २०१३ मधील व्यापम पोलीस भरती प्रकरणातील विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व 31 आरोपींना २१ नोव्हेंबरला दोषी ठरवले. आज याप्रकरणी या दोषी आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयने ३१ आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते असून सर्व आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर होते त्यांना २१ नोव्हेंबरला निकालानंतर कोठडीत पाठविण्यात आले. न्यायालयाने आज ३१ जणांना शिक्षा सुनावली असून या घोटाळ्याचा सूत्रधार प्रदीप त्यागीला १० वर्षांचा कारावास तर उर्वरित ३० आरोपींना ७ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

हे आहेत ३१ दोषी आरोपीअनिल यादव राहणार - प्रयागराज (उत्तर प्रदेश), अजय सिकरवार राहणार - मुरैना, धर्मेश सिंह राहणार - आग्रा (उत्तर प्रदेश), फूलकुंवर सिंह राहणार - मुरादाबाद (उत्तर प्रदेश), देवेंद्र यादव राहणार - झांसी (उत्तर प्रदेश), अजीत चौधरी राहणार - मथुरा (उत्तर प्रदेश), भूपेंद्र सिंह राहणार - मुरैना, सतीश शर्मा राहणार - मुरैना, चंद्रपाल कश्यप राहणार - फरुखाबाद (उत्तर प्रदेश), राहुल पांडे राहणार - वाराणसी (उत्तर प्रदेश), आशी कुमार पांडे राहणार - मिर्जापुर (उत्तर प्रदेश), कुलविजय वर्मा राहणार - बाराबंकी (उत्तर प्रदेश), मुकेश सिंह गुर्जर राहणार - ग्वालियर, अस्र्ण गुर्जर राहणार - ग्वालियर, उदयभान सिंह राहणार - ग्वालियर, दिनेश धाकड़ राहणार - मुरैना, अतेंद्र सिंह राहणार - भिंड, परवेंद्र सिंह राहणार - मुरैना, सुदीप शर्मा राहणार - भिंड, अजय प्रताप सिंह राहणार - मुरैना, कलियान सिंह राहणार - मुरैना, गुलवीर सिंह राहणार - मथुरा (उत्तर प्रदेश), राजवीर सिंह राहणार - मुरैना आणि निवास जाटव राहणार - मुरैना, अभिषेक कटियार राहणार - फस्र्खाबाद (उत्तर प्रदेश), सुयश सक्सेना राहणार - काशीराम नगर (उत्तर प्रदेश), प्रभाकर शर्मा राहणार - मुरैना, प्रदीप त्यागी राहणार- मुरैना, नीरज मिश्रा राहणार - प्रयागराज (उत्तर प्रदेश),पंजाब सिंह जाटव राहणार - मुरैना, शिवशंकर राहणार - मिर्जापुर (उत्तर प्रदेश)काय आहे व्यापम घोटाळा?मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशामधील झालेल्या मोठय़ा गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) हे खरे नाव असले तरी नावाप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये २४ आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित ४० जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठ्या नेत्यांसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली. २००९ मध्ये या घोटाळ्याला सुरुवात झाली होती. २०१३ मध्ये या घोटाळ्याला वाचा फुटली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत होते. 

 

टॅग्स :Courtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागMadhya Pradeshमध्य प्रदेश