लग्नाच्या पहिल्या रात्रीच कौमार्य तपासणी,अमानुष पद्धतींचा अवलंब; विवाहिता पोहोचली कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 20:40 IST2025-01-20T20:40:37+5:302025-01-20T20:40:47+5:30
इंदौरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या एका तरुणीने लग्नाच्या पहिल्या रात्री व्हर्जिनिटी टेस्ट दिली. याविरोधात तिने आता न्यायालयाचा आधार घेतला आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्रीच कौमार्य तपासणी,अमानुष पद्धतींचा अवलंब; विवाहिता पोहोचली कोर्टात
लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री नवरीची व्हर्जिनिटी टेस्ट करण्यात आली. या महिलेने याविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. घटना जुनी असली तरी सासरच्यांनी तिच्यावर हुंड्यासाठी व व्हर्जिनिटी तपासण्यासाठी जो मानसिक आणि शारिरीक त्रास दिला त्याविरोधात तिने दंड थोपटले आहेत.
इंदौरच्या बाणगंगा भागात राहणाऱ्या एका तरुणीने लग्नाच्या पहिल्या रात्री व्हर्जिनिटी टेस्ट दिली. याविरोधात तिने आता न्यायालयाचा आधार घेतला आहे. व्हर्जिनिटी टेस्टसाठी सासरच्यांनी पहिल्या रात्री चुकीचे प्रकार केल्याचा आरोप तिने केला आहे.
जिल्हा न्यायालयात तिने या विरोधात धाव घेतली असून न्यायालयाने तिची तक्रार पाहून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेचा विवाह डिसेंबर २०१९ मध्ये भोपाळमधील एका तरुणाशी झाला होता. लग्नानंतर तिला गर्भपात आणि मृत बाळाला जन्म देणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. सध्या तिला एक मुलगी आहे.
व्हर्जिनीटी टेस्ट करताना चुकीच्या पद्धती वापरल्याने तिला प्रचंड मानसिक आणि शारिरीक त्रास झाला आहे. तसेच हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी मोठा छळ केला आहे.
लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या सासरच्या लोकांनी तिचे कौमार्य तपासण्यासाठी अमानुष पद्धतींचा अवलंब केला होता, असे महिला आणि बालविकास विभागाने केलेल्या तपासात समोर आले आहे.