थुंकी लावून पोळ्या बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल, घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद; 6 जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 20:44 IST2022-01-12T19:33:49+5:302022-01-12T20:44:12+5:30
Viral Video : त्याचे हे किळसवाणं कृत्य घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

थुंकी लावून पोळ्या बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल, घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद; 6 जण अटकेत
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पुन्हा एकदा थुंकी लावून पोळी बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ढाब्यावर थुंकी लावून तंदूरमध्ये रोटी बनवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचे हे किळसवाणं कृत्य घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद
थुंकी लावून पोळी बनवण्याचा व्हिडिओ हा लखनऊच्या कोकोरी पोलीस स्टेशन परिसरात इमाम अली ढाबा येथील असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये एक पोळी बनवणारा तंदूरवर थुंकी लावून बनवत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी धाव घेतली आणि ढाब्याच्या 6 कर्मचाऱ्यांना अटक केली. सध्या या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात पोलीस या लोकांची चौकशी करत आहेत.
थुंकी लावून पोळी बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल
याप्रकरणी पोलीस आयुक्त डीके ठाकूर म्हणाले की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. व्हिडिओच्या आधारे हॉटेल मालक याकूब, कर्मचारी दानिश, हाफिज मुख्तार फिरोज आणि अन्वर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांनी ढाब्याच्या 6 कर्मचाऱ्यांना अटक केली
थुंकी लावून पोळी बनवण्याची ही घटना काही पहिली नाही. याआधीही अनेक ठिकाणी असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नुकताच उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान थुंकी लावून पोळी बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेरठमधील कंकरखेडा पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या विवाह समारंभात तंदूर कारागीर नौशाद थुंकी लावून पोळी बनवताना दिसला होता. या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली.