एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 23:59 IST2025-10-02T23:59:29+5:302025-10-02T23:59:44+5:30
ही घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे बुधवारी रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान घडली आहे.

एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
अझहर अली, लोकमत न्यूज नेटवर्क, संग्रामपूर (जि. बुलढाणा) : एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारीत झाल्याने ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध तक्रारीवरून १५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे बुधवारी रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान घडली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सोनाळा येथे बुधवारी रात्री नवल सोळंके याची नातेवाईकांसोबत बोलचाल सुरू असताना त्याठिकाणी परमेश्वर चव्हान येऊन तु तुझे मुले नवलच्या घरी का जाऊ देतो असे नातेवाईकाला सांगु लागला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. नवलला परमेश्वरने शिवीगाळ सुरू केली. जोराचे भांडण सुरू झाल्याने मध्यस्थी करण्यासाठी सागर सोळंके तेथे आला असता परमेश्वर चव्हान ने सागरच्या डोक्यात फावडा मारून त्याला गंभीररित्या जखमी केले. तसेच गैरकायद्याची मंडळी जमवून नवल सोळंके व त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच बुक्क्यासह काठी व फावड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
याप्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात नवल सोळंके याच्या फिर्यादीवरून परमेश्वर किसन चव्हाण, देवानंद किसन चव्हाण, ईश्वर किसन चव्हाण, किसन जोतीराम चव्हाण, गोरख जोतीराम चव्हाण, ईंद्राबाई भगवान शिंदे, फुलाबाई शंकर शिंदे या ७ आरोपी विरुद्ध कलम ११८(२), १८९ (१), १८९ (२), १८९ (४), १९१ (२), १९१ (३), १९०, ११५ (२) ३५१(२) (३), ३५२ भा. न्या. संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने करीत आहेत.
हाणामारीत लोखंडी रॉडचा वापर
बुधवारी रात्री एकामेकांच्या घरासमोर झालेल्या हाणामारी लाकडी दांड्याचा फावडा व लोखंडी रॉडचा वापर झाला आहे. दुसऱ्या फिर्यादीत नमूद आरोपी नवल सोळंके व इतरांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन देवानंद चव्हाण व त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच चापटा बुक्क्यांसह काठी व लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. देवानंद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलिस ठाण्यात नवल नारायण सोळंके, धनाजी नारायण सोळंके, साजन धनाजी सोळंके, सुनिल साहेबराव सोळंके, राजु साहेबराव सोळंके, संजू साहेबराव सोळंके, राहुल नवल सोळंके, चंद्रकला अवचित चव्हाण या ८ आरोपीविरुद्ध कलम ११८(२), १८९ (१), १८९ (२), १८९ (४), १९१ (२), १९१ (३), १९०, ११५ (२) ३५१(२) (३), ३५२ भा. न्या. संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका रमेश खरात करीत आहेत.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
बुधवारी रात्री झालेल्या हाणामारीत ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सोनाळा पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल झालेल्या १५ पैकी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे.