ग्रेटर नोएडा येथील एका सोसायटीमध्ये डिलिव्हरी बॉय आणि सुरक्षा रक्षक यांच्यात जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठीकाठ्यांनी हल्ला केला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉयने चुकीच्या फ्लॅटची बेल वाजवल्यामुळे हा वाद सुरू झाला आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले.
डिलिव्हरी बॉयने चुकून दुसऱ्याच घराची बेल वाजवली, ज्यावरून मुख्य गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर लवकरच धक्काबुक्कीत झाले. सुरक्षा रक्षकांची संख्या जास्त असल्याचे पाहून डिलिव्हरी बॉयने आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतलं.
यानंतर दोन्ही बाजूचे लोक लाठीकाठ्यांसह आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार शिवीगाळ आणि मारामारी झाली. या हाय-व्होल्टेज ड्राम्यामुळे सोसायटीचे गेट बंद करण्यात आलं होतं. परिणामी रहिवाशांना तासनतास मनस्ताप सहन करावा लागला. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली.
पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी दादरी येथील रहिवासी असलेला डिलिव्हरी बॉय रोहन आणि तीन सुरक्षा रक्षक - आकाश, अभिषेक व राजेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चारही आरोपींना अटक करून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. सध्या परिसरात शांतता आहे.
Web Summary : A delivery boy and security guards in Greater Noida clashed after he rang the wrong doorbell. The fight escalated, leading to arrests and causing inconvenience to residents. Police intervened to restore order; an investigation is underway.
Web Summary : ग्रेटर नोएडा में गलत बेल बजाने पर डिलीवरी बॉय और सुरक्षा गार्डों में झड़प हो गई। लड़ाई बढ़ने पर गिरफ्तारियां हुईं और निवासियों को असुविधा हुई। पुलिस ने हस्तक्षेप कर शांति बहाल की; जांच जारी है।