Video! traffic constable was dragged on car bonnet; youth with girlfriend arrested | थरारक Video! हवालदाराला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले; मैत्रिणीसोबत तरुणावर गुन्हा दाखल

थरारक Video! हवालदाराला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले; मैत्रिणीसोबत तरुणावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
 नागपूर  : कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमोल चिदंमवार यांना कारच्या बॉनेटवर बसवून दुचाकींना धडक मारत समोर जाणारा आरोपी आकाश चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी देशमुख या दोघांविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आली आहे.


रविवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास सक्करदरा चौक ते राजे रघुजी मार्गावर हे थरारनाट्य घडले होते.
 वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून पुढे जात असलेल्या आरोपी चव्हाणची कार हवालदार अमोल यांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. तो थांबत नसल्याचे पाहून हवालदार अमोल कारसमोर उभे झाले.  चव्हाणने त्यांना न जुमानता तशाच अवस्थेत कार दामटली. हवालदार अमोलही बोनट वर चढले. त्या अवस्थेत सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत चव्हाणने आपली कार दामटवत काही दुचाकींना धडक मारली.

पहा व्हिडीओ....

वर्दळीच्या मार्गावर हे थरारनाट्य घडत असल्याचे पाहून नागरिकांनी धाव घेतली आणि चव्हाणची कार थांबवली. त्याला बाहेर खेचत त्याची बेदम धुलाई केली. नंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपी चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूरचा रहिवासी आहे. 

Web Title: Video! traffic constable was dragged on car bonnet; youth with girlfriend arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.