Video : गरोदर मातेचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव; थरार सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 19:29 IST2021-10-18T19:28:16+5:302021-10-18T19:29:11+5:30
RPF jawan saves pregnant mother's life : हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

Video : गरोदर मातेचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव; थरार सीसीटीव्हीत कैद
डोंबिवली: कल्याणरेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक ४ वरून गोरखपूर एक्स्प्रेसऐवजी चुकीच्या लाम्बपल्याच्या गाडीत बसल्याचे लक्षात येताच एका गरोदर मातेने चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अपघातात फलाट आणि रेल्वे ट्रॅक यांच्या गॅपमध्ये ती महिला पडणार होती. मात्र, तेवढयात प्रसंगावधान राखून ऑनड्युटी कामावर असलेल्या आरपीएफ जवानाने त्या महिलेचा जीव वाचवल्याची घटना सोमवारी घडली. हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
एस. आर. खांडेकर असे त्या जवानाचे नाव असून त्यांनी आठ महिन्यांची गरोदर असलेल्या वंदना (२१ वर्षे) नामक महिलेला वाचवले. सोमवारी पहाटे सहा वाजून ५ मिनिटांनी एक गाडी कल्याण स्थानकात आली, ती गाडी गोरखपूरला जाणार असे वाटल्याने ती माता त्या गाडीत चढली, पण आत गेल्यावर तीला अपेक्षित गाडी नसल्याचे कळताच तिने उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी गाडीला सिग्नल मिळाल्याने ती सुरू झाली होती, चालत्या गाडीतून देखील तिने फलाटात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यात तिचा तोल गेला आणि ती फलाट आणि रूळ यांच्या गॅपमध्ये जाणार तेवढ्यात खांडेकर यांनी प्रसंगावधान राखून तिचा जीव वाचवला. त्यावेळी तिच्यासमवेत पती चंद्रेश सोबत होते. आरपीएफ जवानाने त्यांच्या जीवाची पर्वा न करता त्या महिलेला सुखरूप वाचवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक झाले.
गरोदर मातेचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव; थरार सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/nEL7EufcpZ
— Lokmat (@MiLOKMAT) October 18, 2021