Video made after rape woman : नोकरी देतो सांगत आधी बलात्कार, मग बनवला व्हिडीओ; जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मानित होता आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 20:34 IST2021-04-06T20:26:19+5:302021-04-06T20:34:21+5:30
Video made after rape woman : आरोपी ड्रायव्हरचं काम करत असून नोकरी देण्याचं आमिष दाखवत या माणसानं या महिलेसह शारीरिक संबंध ठेवले होते.

Video made after rape woman : नोकरी देतो सांगत आधी बलात्कार, मग बनवला व्हिडीओ; जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मानित होता आरोपी
मध्यप्रदेशातील पोलिसांनी एका अशा आरोपी ताब्यात घेतलं आहे, ज्याला जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आलं होतं. इतकंच नाही जिल्हाधिकारी आणि एसपींकडूनही त्याचा सन्मान झाला होता. मध्यप्रदेशातील विदिशा कुमार गल्ली परिसरातून ही धक्कदायक घटना समोर आली आहे. आरोपी ड्रायव्हरचं काम करत असून नोकरी देण्याचं आमिष दाखवत या माणसानं या महिलेसह शारीरिक संबंध ठेवले होते.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर या महिलेचाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आरोपीचं नाव अखिलेश सोनी असून पीडित महिलेला नोकरीचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर कारवाई करत मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पीडित महिला आपल्या कुटुंबासह त्याच इमारतीत राहते.
त्याच ठिकाणी आरोपी वरच्या मजल्यावर काम करतो. यातून धक्कादायक खुलासा करण्यात आला असून आरोपी अखिलेश सोनी हा माणूस दीर्घकाळ नगर सुरक्षा समितीचा सदस्य होता. पीडित महिलेची लहान मुलं असून आरोपी आणि पीडित एकाच इमारतीत राहतात. १० हजार रूपयांच्या नोकरीचे आमिष दाखवून हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. सध्या हा आरोपी ड्रायव्हरचं काम करत असल्याचं समोर येत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
शारीरिक व मानसिक त्रास देऊन तसेच चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. दिघी येथे रविवारी (दि. ४) ही घटना घडली. रजत संजय बोर्डे (वय २७, रा. दिघी), असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे. दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची २२ वर्षीय मुलगी तिच्या पतीसोबत दिघी येथे राहत होती. राहत्या घरात गळफास घेऊन तिने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी (दि. ४) उघडकीस आला. याप्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे तपास करीत आहेत. मला फक्त मित्र म्हणून राहायचंय', असं बोलला, म्हणून तरूणीनं शेअर केले न्यूड फोटो अन् मग....