Video : चिमुकलीचा आक्रोश! हातपाय बांधून ठेवले कडक उन्हात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 21:24 IST2022-06-08T21:12:31+5:302022-06-08T21:24:17+5:30

Video Viral : या व्हिडिओमध्ये, अल्पवयीन मुलगी कडक उन्हात सतत रडताना दिसत आहे.

Video: kid's outcry! Hands and feet tied in scorching sun, video goes viral on social media | Video : चिमुकलीचा आक्रोश! हातपाय बांधून ठेवले कडक उन्हात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : चिमुकलीचा आक्रोश! हातपाय बांधून ठेवले कडक उन्हात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्लीदिल्लीमध्ये एका चिमुरडीचे हात पाय बांधून कडक उन्हात टेरेसवर ठेवल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांना या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले गेले आहे. या व्हिडिओमध्ये, अल्पवयीन मुलगी कडक उन्हात सतत रडताना दिसत आहे.

 

२५ सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओतून लहान मुलीचे हात पाय दोरीने बांधून टेरेसवर रखरखत्या उन्ह्यात ठेवले असून जोरजोरात आई ... आई.. करत रडत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हालाही त्या चिमुकलीचे दया येईल. उन्ह्यात लागणाऱ्या चटक्यांमुळे ती जोरजोरात किंचाळत असून मदतीसाठी आईला साद देत आहे. तसेच हा व्हिडीओ समोरच्या टेरेसवरून चित्रित केला असल्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ कुठला याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळाली नाही आहे. हा बाल अत्याचाराचा व्हिडीओ असून पोलिसांनी या प्रकरणाची दाखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. 

Web Title: Video: kid's outcry! Hands and feet tied in scorching sun, video goes viral on social media