Video : परदेशी नागरिकांचा मुंबईत जीवघेणा स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 21:10 IST2018-11-27T21:06:02+5:302018-11-27T21:10:00+5:30
परदेशी नागरिकांनी मुंबईतील या इमारतीच्या टेरेसवर केलेल्या जीवघेण्या स्टंटमुळे पोलिसांचा यांचा शोध घेणं सुरु केलं असताना दोघांना ताब्यात घेतले आहे.

Video : परदेशी नागरिकांचा मुंबईत जीवघेणा स्टंट
मुंबई - प्रभादेवी येथील इंडिया बुल्सशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एसआरए सोसायटीच्या इमारतीवरुन पाच तरुणांपैकी एका तरुणाने एका इमारतीच्या टेरेसच्या कठड्यावरून दुसऱ्या इमारतीच्या टेरेसवर उडी मारण्याचा जीवघेणा स्टंट केला आहे. काळीज धस्स करणारा हा स्टंट कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे. पाच परदेशी नागरिकांनी हा स्टंट केल्याचं उघड झालं असून दादर पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांनी अशा स्टंटबाजांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी होती. त्यामुळे परदेशी नागरिकांनी मुंबईतील या इमारतीच्या टेरेसवर केलेल्या जीवघेण्या स्टंटमुळे पोलिसांचा यांचा शोध घेणं सुरु केलं असताना दोघांना ताब्यात घेतले आहे.