Video : Coronavirus : सावधान! सायबर पोलिसांचे सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांकडे आहे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 08:42 PM2020-04-08T20:42:14+5:302020-04-08T20:48:35+5:30

Coronavirus : १९ नवीन गुन्हे दाखल करण्यात आले 

Video : Coronavirus: No one is tolerate for cyber crime: Special Inspector General of Police pda | Video : Coronavirus : सावधान! सायबर पोलिसांचे सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांकडे आहे लक्ष 

Video : Coronavirus : सावधान! सायबर पोलिसांचे सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांकडे आहे लक्ष 

Next
ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटरवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. सायबर गुन्ह्यासंदर्भात कोणाचीही गय नाही : विशेष पोलीस महानिरीक्षक

मुंबई  - महाराष्ट्र सायबरची लॉकडाऊनच्या काळात प्रभावी कारवाई सुरू असून  कोणाचीही गय केली जाणार नाही. संबंधितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे  सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कळविले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटरवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. 


राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये नविन १९ असे  मंगळवारपर्यंत  एकूण १३२ गुन्हे दाखल झाले आहेत .त्याचे  विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी ७९ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी २४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. titktok विडिओ शेअर केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ३५ आरोपींना अटक केली आहे. 

 

या गुन्ह्यांमध्ये आरोपीनी आपल्या फेसबुक / व्हाट्स अ‍ॅप  व अन्य सोशल मीडियाचा (social media) वापर करून कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या, ज्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
  
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना सूचित करते की, कोरोना व्हायरस संदर्भात अफवा पसरविणे ,खोटी/चुकीची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करणे अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल व त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही . त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यापासून अलिप्त राहावे. 


महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या whatsapp किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media)पसरवू नयेत, व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे .

Web Title: Video : Coronavirus: No one is tolerate for cyber crime: Special Inspector General of Police pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app