Video : भाजपा नगरसेविकेच्या पतीने नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केली तोडफोड  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:39 PM2021-05-15T20:39:37+5:302021-05-15T20:40:24+5:30

BJP corporator's husband vandalizes hospital : घटनास्थळी पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

Video : BJP corporator's husband vandalizes Nashik Municipal Corporation's Bitco Hospital | Video : भाजपा नगरसेविकेच्या पतीने नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केली तोडफोड  

Video : भाजपा नगरसेविकेच्या पतीने नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केली तोडफोड  

Next
ठळक मुद्देभाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी तोडफोड केल्याचे वृत्त असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

नाशिक-  नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रूग्णालयात भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी तोडफोड केल्याचे वृत्त असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.पोलिसांनी रुग्णालय बंद केले असून सध्या नागरिकांची बाहेर गर्दी झाली आहे.

नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत मात्र रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची ईनोवा कार मध्ये नेली आणि तोडफोड केली असे सांगितले जात आहे. अद्याप अधिकृत  माहिती मिळू शकलेली नाही. घटनास्थळी पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

Web Title: Video : BJP corporator's husband vandalizes Nashik Municipal Corporation's Bitco Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app