Video : भारतमाता की जय! घोषणा देत गुणरत्न सदावर्ते पोहोचले सातारा पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 06:23 PM2022-04-14T18:23:00+5:302022-04-14T18:23:59+5:30

Gunratna Sadavarte : सदावर्ते यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांना सातारा पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याने अडचणी वाढल्या आहेत. 

Video: Bharatmata Ki Jai! Announcing this, Gunaratna Sadavarte reached Satara Police Station | Video : भारतमाता की जय! घोषणा देत गुणरत्न सदावर्ते पोहोचले सातारा पोलीस ठाण्यात

Video : भारतमाता की जय! घोषणा देत गुणरत्न सदावर्ते पोहोचले सातारा पोलीस ठाण्यात

googlenewsNext

सातारा : वकील गुणरत्न सदावर्ते सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणले. मुंबईतील आर्थर रोड जेलमधून सकाळी सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेत सातारा शहर पोलीस ठाण्यात आता दाखल झाले. त्यावेळी भारतमाता की जय अशा घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी दिल्या. दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटण तालुक्यातील कोंजवडे येथील राजेश निकम यांनी ही तक्रार दाखल केली. 

मागील ४ महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यात काही संतप्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घरावर हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी गिरगाव कोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांना सातारा पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याने अडचणी वाढल्या आहेत. 

Web Title: Video: Bharatmata Ki Jai! Announcing this, Gunaratna Sadavarte reached Satara Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.