Video : धावती लोकल पकडताय तर सावधान ! दादर स्थानकावर दोन महिला लोकलखाली जाता जाता वाचल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 19:10 IST2019-01-15T19:05:12+5:302019-01-15T19:10:23+5:30
मोटरमनच्या शेजारीच हा डब्बा असल्याने पोलिसांनी मोटरमनला इशारा करून लोकल थांबविण्यास सांगितले. त्यानंतर लोकल थोडी पुढे गेली असताना मोटरमनने लोकल थांबवली. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर पडलेल्या दोन महिलांना पोलिसांनी आधार देत उठवले.

Video : धावती लोकल पकडताय तर सावधान ! दादर स्थानकावर दोन महिला लोकलखाली जाता जाता वाचल्या
मुंबई - दादरच्या मध्य रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दोन महिला लोकलखाली जाता जाता वाचल्या आहेत. या दोन महिलांचे प्राण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत. काल दादरच्या मध्य रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धावती लोकल दोन महिला पकडत असताना त्यांचा हात सटकून त्या खाली पडल्या. मात्र प्लॅटफॉर्म तैनात रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्या दोन महिला लोकलखाली जाता जाता वाचल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या पहिल्या महिला डब्ब्याच्या ठिकाणी ही घटना घडली. त्यावेळी मोटरमनच्या शेजारीच हा डब्बा असल्याने पोलिसांनी मोटरमनला इशारा करून लोकल थांबविण्यास सांगितले. त्यानंतर लोकल थोडी पुढे गेली असताना मोटरमनने लोकल थांबवली. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर पडलेल्या दोन महिलांना पोलिसांनी आधार देत उठवले.