Video - संतापजनक! सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 19:09 IST2022-06-25T19:07:55+5:302022-06-25T19:09:06+5:30
Video - मुख्याध्यापकाने शिक्षिकेला केलेल्या मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Video - संतापजनक! सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला चपलेने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. लखीमपूर खीरीमधील एका मुख्याध्यापकाने एका शिक्षिकेला चपलेने बेदम मारहाण केली. मुख्याध्यापकाने शिक्षिकेला केलेल्या मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षिकेला शाळेत येण्यासाठी फक्त दहा मिनिटं उशीर झाला म्हणून मारहाण केल्याचं समोर आलं आहे. संतापलेल्या मुख्याध्यापकाने सुरुवातीला शिक्षिकेला शिवीगाळ केली आणि नंतर थेट चपलेने मारू लागला. शिक्षण अधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी माहिती दिली आहे की, व्हायरल व्हिडिओच्या आधारे मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. लखीमपूर खेरी जिल्ह्यात शाळेत उशीरा आल्याने मुख्याध्यापकाने एका महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण केली.
#WATCH | Principal of a government school in Uttar Pradesh's Lakhimpur thrashed a female teacher with shoes
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 24, 2022
(Source: Viral video) pic.twitter.com/hCRiMuVsgV
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक अजित वर्मा पाहायला मिळत आहे, जो शाळेत 10 मिनिटे उशिरा आल्याने महिला शिक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. या घटनेच्या वेळी शाळेमध्ये इतर लोकांसह विद्यार्थी देखील उपस्थित होते. इतर शिक्षक मुख्याध्यापकाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण तो ऐकत नाहीत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे.