शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"मला मरायचं नाही, मुलांसाठी जगायचंय, पण पती मारुन टाकेल"; रीलनंतर २४ तासांत अंजलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 09:44 IST

रील बनवणाऱ्या अंजली देवीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रील बनवणाऱ्या अंजली देवीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूआधी अंजलीने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करून आपली व्यथा मांडली होती, परंतु यंत्रणा आणि समाजाच्या उदासीनतेमुळे तिचा जीव वाचू शकला नाही. "मला मरायचं नाही, मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे, पण माझा पती मला मारून टाकू शकतो..." फेसबुकवर रडत रडत हे सांगणाऱ्या अंजली देवीची तिचा पती कुंदन साह याने हत्या केली. 

अंजली देवी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असायची आणि अनेकदा रील्स बनवत असे. तिचा पती कुंदन कुमारला हे अजिबात आवडत नव्हतं. रील स्टार अंजलीच्या व्हिडिओनुसार, कुंदन तिला खाण्यासाठी काही देत नव्हता. तो स्वतः बाजारातून खाऊन यायचा, पण पत्नी आणि मुलांना जेवण देत नसे.

अंजलीने सांगितलं होतं की, जेव्हा ती काम करण्यासाठी बाहेर पडायची, तेव्हा पती तिच्यावर खोटे आरोप करायचा. अंजलीने हाजीपूरमधील एका क्लिनिकवर चुकीचे उपचार केल्याचाही गंभीर आरोप केला होता आणि एसपींकडे मदतीची मागणी केली होती. तिने सोमवारी धरणं आंदोलन करण्याबाबतही व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता.

अंजलीच्या मोठ्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सर्व काही सामान्य होतं. परंतु सोमवारी सकाळी जेव्हा मंदिरात गाणी वाजत होती, तेव्हाच वडील कुंदन यांनी दोरीने अंजलीचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत कुंदन साहला अटक केली आहे.

अंजली आणि कुंदनचं नाते एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हतं, पण त्याचा शेवट अत्यंत भयानक झाला. अंजलीचं पहिले लग्न समस्तीपूरमध्ये झालं होतं, तिला दोन मुलं होती. फेसबुकच्या माध्यमातून तिची ओळख वैशाली येथे राहणाऱ्या कुंदनशी झाली. २०२१ मध्ये दोघे मुंबईला गेले, जिथे कुंदनने तिला सोडून दिलं होतं.

अंजलीने हार न मानता कुंदनच्या घरी येऊन राहण्याचा मोठा निर्णय घेतला. कायदेशीर लढाईनंतर कुंदन जेलमध्येही गेला होता, पण बाहेर आल्यानंतर त्यांच्यातील वाद पुन्हा वाढला आणि अखेर फेसबुकवरून सुरू झालेल्या या प्रेमकथेचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Reel Star Anjali Murdered: Wanted to Live for Children

Web Summary : Anjali Devi, a reel creator, was murdered by her husband after she pleaded for help on social media, fearing for her life. Despite her cries, societal apathy led to her tragic end, highlighting domestic abuse concerns.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू