Uttar Pradesh man murdered by girlfriends other boyfriend after caught in compromising position | दगाबाज रे! ती दुसऱ्या बॉयफ्रेन्डसोबत मजा मारत होती अचानक पहिला बॉयफ्रेन्ड घरी आला आणि.....

दगाबाज रे! ती दुसऱ्या बॉयफ्रेन्डसोबत मजा मारत होती अचानक पहिला बॉयफ्रेन्ड घरी आला आणि.....

(फोटो - प्रातिनिधिक)

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका व्यक्तीने कथितपणे त्याच्या प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराची गळा दाबून हत्या केली आहे. पोलिसांनी हत्येची गुन्हा दाखल करून तरूणाला आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. आरोप आहे महिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मृत व्यक्तीचं नाव सरजीत कुमार आहे. तो बुधवार ६ जानेवारीपासून बेपत्ता होता आणि त्याचा मृतदेह शुक्रवारी सुनसी गावात सापडला. गावातील लोकांनी माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालं की, त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली'. 

कसा झाला खुलासा?

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, 'तपासादरम्यान एक विधवेसोबत सरजीतचे संबंध असल्याचे समजले होते. सरजीतच्या मोबाइलच्या सर्विलांसच्या आधारावर महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली गेली. त्यानंतर महिलेने सांगितले की, तिचे सरजीत आणि हरपालसोबत संबंध होते. दोन वर्षांआधी पतीच्या मृत्यूनंतर ती दोघांवर अवलंबून होती. मात्र, हरपाल आणि सरजीतला एकमेकांबाबत काहीही माहिती नव्हती'.

हरपालने दोघांना आक्षेपार्ह स्थितीत बघितलं

महिलेने पोलिसांना सांगितले की, बुधवारी हरपाल अचानक घरी आला आणि त्याने तिला सरजीतसोबत आक्षेपार्ह स्थितीत बघितलं. त्यामुळे तो रागाने लाल झाला होता आणि त्याने रागाच्या भरात सरजीतचा गळा दाबून त्याची हत्या केली. महिलेने मान्य केलं आहे की, तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हरपालची मदत केली होती.
 

Web Title: Uttar Pradesh man murdered by girlfriends other boyfriend after caught in compromising position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.