शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! आई ओरडली म्हणून 'तिने' घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 15:52 IST

Crime News : आई ओरडली म्हणून एका अल्पवयीन मुलीने घर सोडल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. आई ओरडली म्हणून एका अल्पवयीन मुलीने घर सोडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीला वाटेत काही नराधमांनी गाठलं आणि तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास देखील करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या ग्रामीण भागातील इटौंजा भागात संबंधित घटना घडली आहे. आई ओरडली म्हणून 14 वर्षीय मुलगी नाराज होऊन घराबाहेर पडली. तिने घरी परत येणार नाही, अशी आई-वडिलांना धमकी दिली. ती घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या वडिलांनी इटौंजा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार केली होती. याच दरम्यान रस्त्याने चालताना एक ई-रिक्षाचालक मुलीला भेटला. इकरामुद्दीन असं या रिक्षाचालकाचं नाव असून त्याने तिची विचारपूस केली. 

मुलीने खूप भूक लागल्याचं सांगितलं असता त्याने तिला आपल्यासोबत चल असं सांगितलं. तसेच तुझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करू असं देखील म्हटलं. त्यामुळे मुलगी घरी जाण्यास तयार झाली. इकरामुद्दीनने मुलीला घरी नेल्यानंतर त्याच्या पाच मित्रांना फोन करुन घरी बोलावलं. त्यानंतर सहा जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपीने जेवण घेऊन येण्याच्या बहाण्याने मित्रांना फोन केला.  पोलिसांनी आरोपी इकरामुद्दीन याच्यासह त्याचे मित्र शकील, उत्तम शर्मा, मोहम्मद नफीस, नूर मोहम्मद आणि रितेश यादव यांना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार; घटनेने खळबळ

आपल्या मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये ही घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचं काही तरुणांनी अपहरण केलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पीडित तरुणीला आणि तिच्या मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली. तरुणी मित्रांसोबत फिरायला गेली असताना काही तरुणांनी त्यांना अडवलं आणि पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक