नात्याला काळीमा! मोठ्या भावानेच केला विवाहित बहिणीवर बलात्कार; Video व्हायरल करण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 16:03 IST2021-01-13T15:57:15+5:302021-01-13T16:03:09+5:30
Crime News : पीडित महिलेने याबाबत कोणालाही सांगू नये यासाठी तिला बलात्काराची व्हिडीओ क्लिप ऑनलाईन अपलोड करून व्हायरल केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे.

नात्याला काळीमा! मोठ्या भावानेच केला विवाहित बहिणीवर बलात्कार; Video व्हायरल करण्याची दिली धमकी
नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मोठ्या भावाने विवाहित बहिणीवर बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे भावाच्या मित्रानेच या घटनेचा एक व्हिडीओ शूट केला आहे. पीडित महिलेने याबाबत कोणालाही सांगू नये यासाठी तिला बलात्काराची व्हिडीओ क्लिप ऑनलाईन अपलोड करून व्हायरल केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील एका गावात भावाने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या विवाहित बहिणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नशेत असताना हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. 23 डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेचा घरी नसताना मोठा भाऊ तिच्या घरी आला. त्यावेळी तो नशेत होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. मित्राने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढला आणि महिलेला धमकी दिली. तक्रार केल्यास अथवा कोणालाही याबाबत सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल केल्याची धमकी दिली.
पीडित महिलेने आपल्या घरी हा संपूर्ण प्रकार सांगितल्यावर आई-वडिलांनीही तिला पोलिसात न जाण्यास सांगितलं. त्यासाठी तिच्यावर दबाव आणला. आरोपी वारंवार त्रास देत असल्याने महिलेने पोलिसांत धाव घेऊन तिच्यासोबत घडलेला हा भयंकर प्रकार सांगितला. महिलेने तक्रार दिल्यानंतर मुरादाबाद पोलिसांनी पीडितेचा भाऊ व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. "ही घटना घडल्यानंतर आपण पतीला सांगितलं. त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पण कुटंबीयांनी समाजातील प्रतिष्ठा धुळीला मिळेल असं सांगत तक्रार न करण्यासाठी दबाव टाकला" असं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
भयंकर! संतापजनक घटनेने खळबळhttps://t.co/5WiSHy4JUP#crime#Rape
— Lokmat (@MiLOKMAT) January 8, 2021
विकृतीचा कळस! दारूच्या नशेत मुलाने केला 75 वर्षीय आईवर बलात्कार
आरोपी भाऊ महिलेचं घर असलेल्या परिसरातच फिरायला लागला. तसेच तिला घाबरवून धमकी देऊ लागला. त्यामुळे तक्रार केल्याचं महिलेने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे संतापजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत मुलानेच आपल्या 75 वर्षीय आईवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नशेत घरी आलेल्या आरोपीने आपल्या पत्नी आणि सूनेसमोरच आईवर अत्याचार केला. आरोपीच्या सूनेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आग्रा येथील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीकरी या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. 45 वर्षीय अमर सिंह हा पत्नी, मुलगा आणि सूनेसोबत राहत आहे. अमर सिंह रोज दारू पिऊन घरी येत असे. बुधवारी रात्री अमर सिंह याचा मुलगा घरात नव्हता. त्याचवेळी अमर सिंह हा दारू पिऊन घरी आला. तो खोलीत गेला आणि आईवर बलात्कार केला. आईने आरडाओरड केल्यानंतर अमर सिंहची पत्नी आणि सून मदतीसाठी धावून गेली. मात्र खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्या काही करू शकल्या नाहीत. लज्जास्पद प्रकारानंतर सूनेने लगेचच पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात़डीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी अमर सिंह याला ताब्यात घेतले.
विद्यार्थिनीची छेड काढणं पडलं भारी, नातेवाईकांनी धू-धू धुतलं; सोशल मीडियावर Video व्हायरलhttps://t.co/OOoDTfRuuu#BJP
— Lokmat (@MiLOKMAT) January 11, 2021