धक्कादायक! तरुणी प्रियकराला भेटत होती, संतापलेल्या पित्याने उचलले टोकाचे पाऊल, गाठले पोलीस ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:00 IST2024-01-03T12:57:54+5:302024-01-03T13:00:25+5:30

आरोपीने हत्या करुन पोलीस ठाणे गाठले.

uttar pradesh crime news father killed daughter and her boyfriend and surrender in front of police in badayun | धक्कादायक! तरुणी प्रियकराला भेटत होती, संतापलेल्या पित्याने उचलले टोकाचे पाऊल, गाठले पोलीस ठाणे

धक्कादायक! तरुणी प्रियकराला भेटत होती, संतापलेल्या पित्याने उचलले टोकाचे पाऊल, गाठले पोलीस ठाणे

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बदायूं जिल्ह्यातील कोतवाली बिलसी भागात, आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे संतप्त झालेल्या एका पित्याने मंगळवारी सकाळी  आपल्या मुलीवर आणि तिच्या कथित प्रियकरावर फावड्याने वार करून हत्या केली. घटनेनंतर वडिलांनी रक्ताच्या थारोळ्यात पोलीस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी जवळच्या मित्राची हत्या, १ कोटी रकमेसाठी स्वत:च्या मृत्यूचा केला बनाव

 पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रथमदर्शनी ही हत्या प्रेम प्रकरणामुळे झाल्याचे दिसून येत आहे. कोतवाली बिल्सी येथील परौली गावात राहणारा अनुसूचित जातीचा सचिन (२०) आणि त्याच गावातील महेशची मुलगी नीतू (२०) यांचे जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. घरच्यांनाही याची माहिती होती. सचिन आणि नीतूच्या नात्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव होता. घरच्यांनी दोघांनाही थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण कसे तरी ते संपर्कात राहिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सोमवारी मध्यरात्री नीतूला तिच्या घरी भेटण्यासाठी आला होता. दोघेही नीतूच्या घराच्या दारात बसले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास आवाज ऐकून नीतूच्या कुटुंबीयांना जाग आली आणि सर्वांनी मिळून सचिन आणि नीतू यांच्यावर हल्ला केला. कुटुंबीयांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. नीतूचे वडील महेश यांनी दोघांचीही फावड्याने वार करून हत्या केली. घटनेनंतर मुलीच्या इतर कुटुंबीयांनी घटनास्थळावरून पळ काढला मात्र नीतूचे वडील महेश फावडे घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि तेथे आत्मसमर्पण केले. एसएसपी म्हणाले की, सचिनच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: uttar pradesh crime news father killed daughter and her boyfriend and surrender in front of police in badayun