मैत्रीच्या नात्याला काळीमा; ७५ वर्षीय वृद्धाचा आपल्या जिगरी मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 16:50 IST2025-09-14T16:24:34+5:302025-09-14T16:50:19+5:30
पाच महिन्यांनी मुलगी गरोदर झाल्यावर घटना उघडकीस आली.

मैत्रीच्या नात्याला काळीमा; ७५ वर्षीय वृद्धाचा आपल्या जिगरी मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
UP Crime: उत्तर प्रदेशातील औरैया येथून मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका ७५ वर्षीय वृद्धाने आपल्या जिगरी मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना सुमारे पाच महिन्यांपूर्वी घडली, मात्र आता मुलगी गरोदर राहिल्यामुळे घटना उघडकीस आली आहे.
मैत्रीच्या नात्याला काळीमा
पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी शेतातून घरी परतत होती, यावेळी आरोपी बिसंबर दयालने तिला प्रसाद खाऊ घालण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर तिला याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलीने ही घटना अनेक महिने लपवून ठेवली, परंतु पाच महिन्यांनी घटना उघडकीस आली.
मुलगी गरोदर राहिली...
त्या घटनेच्या पाच महिन्यांनंतर मुलगी गरोदर झाल्यावर तिने संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली. पीडित मुलीच्या आईने तात्काळ बिधुना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी बिसंबर दयालला अटक केली. तसेच, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून गरोदर असल्याची पुष्टी केली. पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे परंतु स्थानिक लोकही या घटनेमुळे संतापले आहेत.