Video: बेईमान डॉगी... चोरट्याच्या प्रेमात फसला अन् मालकाची १ लाखांची दुचाकी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 08:56 IST2023-08-08T08:47:56+5:302023-08-08T08:56:21+5:30

संबंधित व्हिडिओतू दिसून येते की, एक चोर गॅरेजमध्ये आला आहे, तो तेथून एका दुचाकीची चोरी करतो, तेव्हा तेथे कुत्रा येतो.

Unscrupulous doggy...falls in love with thief, theft of owner's 1 lakh bike in america, video viral on social media | Video: बेईमान डॉगी... चोरट्याच्या प्रेमात फसला अन् मालकाची १ लाखांची दुचाकी चोरी

Video: बेईमान डॉगी... चोरट्याच्या प्रेमात फसला अन् मालकाची १ लाखांची दुचाकी चोरी

कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी मानला जातो. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाच्या बहुतांश घटनाही सर्वांना परिचीत आहेत. विशेष म्हणजे चित्रपटांच्या माध्यमातूनही कुत्रा आणि मालकाप्रतीचा प्रामाणिकपणा लोकांपर्यंत पोहोचला आहे. तर, पोलीस दलात स्पेशल डॉग स्कॉडच्या माध्यमातून चोरीसह विविध गुन्ह्यांचा तपासही लावला जातो. मात्र, एका घटनेत कुत्र्याने चक्क चोराशी मैत्री केली अन् त्याच्या मालकाची १ लाख रुपयांची बाईक चोरी करण्यास मदत केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

संबंधित व्हिडिओतू दिसून येते की, एक चोर गॅरेजमध्ये आला आहे, तो तेथून एका दुचाकीची चोरी करतो, तेव्हा तेथे कुत्रा येतो. तो चोराचा पाठलाग करतो. त्यामुळे चोर जागेवरच थांबतो आणि कुत्र्याकडे पाहतो. त्यानंतर, कुत्र्याला प्रेमाने हाक मारत जवळ घेतो, अंगावरुन हात फिरवत आय लव्ह यू बोलतो. त्यामुळे, कुत्राही चोराच्या प्रेमाला प्रतिसाद देतो आणि दोघांमध्ये मैत्री झाल्याचे दिसून येते. ही घटना अमेरिकेतील सॅन डिएगो येथील आहे. पोलिसांनीच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. 

पोलिसांनीच सांगितली घटना

सैन डिएगो पोलिसांनी ५ जुलै रोजी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एक व्यक्ती गॅरेजमध्ये आला होता. त्यावेळी, त्याने २०१९ चं मॉडेल असलेली इलेक्ट्रा ३-स्पीड सायकलची चोरी केलीय. या सायकलीची किंमत अंदाजे १ लाख रुपये आहे. चोर ही दुचाकी घेऊन गॅरेजबाहेर निघाला होता. त्यावेळी, कुत्र्याने त्याला पाहून जवळ आला. मात्र, चोरट्याने कुत्र्यासोबत प्रेमळ संवाद साधला, त्याला ओंजारला-गोंजारला. त्यामुळे, कुत्राही शांत बसला. संशयित चोरटा गोऱ्या रंगाचा असून निळ्या रंगाची शॉर्ट आणि ग्रे कलरचा शर्ट परिधान केला होता. तर, डोक्यावर निळ्या आणि पांढऱ्या रंगाची टोपीही घातली होती. 

Web Title: Unscrupulous doggy...falls in love with thief, theft of owner's 1 lakh bike in america, video viral on social media