गुप्तांग कापून ठार मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक संबंध; चारकोप पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 18:35 IST2021-12-21T18:34:34+5:302021-12-21T18:35:52+5:30

Unnatural Sex Case : याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत अटक गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Unnatural relationships threatening a minor; Arrested by Charkop police | गुप्तांग कापून ठार मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक संबंध; चारकोप पोलिसांकडून अटक

गुप्तांग कापून ठार मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक संबंध; चारकोप पोलिसांकडून अटक

मुंबई: चौदा वर्षाच्या मुलाला एका तृतीयपंथीयाने जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रकार चारकोप परिसरात सोमवारी उघड झाला आहे. याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत अटक गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

पीडित मुलगा हा चारकोप गावचा राहणारा आहे. त्याचे पालक कामावर निघून गेल्यानंतर तो घरी एकटाच असायचा. त्याचा फायदा घेत शेजारी राहणारा किन्नर त्याच्या घरी येऊन त्याच्यासोबत अत्याचार करायचा. सूत्रांच्या म्हणण्यानुसार पीडिताने त्याला जेव्हा विरोध केला तेव्हा त्याचे गुप्तांग कापत त्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या सगळ्याला अखेर घाबरलेल्या पीडिताने पालकांना घडलाप्रकार सांगितला आणि त्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसानी याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी दिला.

Web Title: Unnatural relationships threatening a minor; Arrested by Charkop police