शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

‘कोब्रा’द्वारे पत्नीचा खून; पोलिसांनी शून्यातून उभा केला खटला, न्यायालयाकडूनही कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:17 AM

पतीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा

- डाॅ. खुशालचंद बाहेतीतिरुवनंतपूरम - विषारी नागाचा शस्त्रा सारखा वापर करत पत्नीचा खून करणाऱ्या पतीला दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा देणाऱ्या न्यायालयाने कोलम (केरळ) पोलिसांचे बहुतेक पुरावे मान्य केले. याच आधारावर पोलिसांनी पतीचा पत्नीला सापांचा शाप होता व यातून साप तिच्या मागावर होते व २ वेळा चावले हा अंधश्रद्धापूर्ण दावा उधळून लावला.

पोलिसांनी सादर केलेले पुरावे याप्रमाणेउत्तराचा मृत्यू सर्पदंशाने झाला.पहिल्या दंशानंतर उत्तराचे आई-वडील तिला माहेरी नेऊ इच्छित होते. त्यांनी तिचे दागिने परत करण्यास सांगितल्यानंतर पतीने रडून त्यांचा विश्वास मिळविला.जानेवारी २० पासून पती इंटरनेटवर सापांची, सर्पमित्रांची माहिती मिळवत होता. यापैकी सुरेश या सर्पमित्रास प्रत्यक्ष भेटला.पतीने सुरेश या सर्प मीत्रा कडुन साप पकडण्याचे प्रात्यक्षिक पाहिले व नंतर इंटरनेटवरून सर्प हाताळण्याचे कसब शिकला.सुरेशकडून १० हजारात घोणस (साप) विकत घेतला .  १० हजार देताना, घोणस घेताना हजर असलेला साक्षीदार.याच दिवशी सर्पमित्रासमोर पुन्हा एकदा स्वत: साप हाताळण्याचे प्रात्यक्षिक केले.२७ फेब्रुवारी ला पतीने पायऱ्यावर साप ठेवून वरच्या मजल्यावरून मोबाईल आणण्यास उत्तराला सांगितले, पण साप पाहताच उत्तरा ओरडली. यानंतर पतीने सापास  पकडून पिशवीत ठेवले. हे कसब पाहून उत्तरालाही आश्चर्य वाटले.३ मार्च रोजी ती झोपेत असताना उत्तराला सर्पदंश झाला त्यावेळी ती वरच्या मजल्यावर पलंगावर झोपली होती. हा दंश घोणसचा असल्याचा निष्कर्ष.उत्तरा आयसीयुत असतानाही पतीचे इंटरनेटवर कोब्राची माहिती शोधणे. सर्प मित्राकडे कोब्राची मागणी करणे.सर्पमित्र सुरेशकडून २४ एप्रिल रोजी कोब्रा विकत घेतलासर्पमित्र सुरेश याने माफीचा साक्षीदार म्हणून दिलेला जबाब.६ मे रोजी उत्तराला दंश झाला असतानाही सूरजचे सकाळी लवकर उठून  रुम बाहेर येणे व या बद्दल अनभीज्ञता दाखवणे दवाखान्यात कोणालाही माहीत नसलेले साप चावलेले ठिकाण पतीने डॉक्टरांना दाखवणे.दोन्ही दंशाच्या वेळी सूरज उत्तरासोबत असणेदोन्ही दंशाच्या वेळी उत्तराला गुंगीचे औषध देण्यात आल्याचा अहवाल.सायबर तज्ज्ञांनी मोबाईलमध्ये शोधून काढलेले कोब्राचे फोटो.कोब्रा ठेवलेली प्लास्टिक बरणी.पतीचे प्रत्येक घटनेच्या वेळेचे असामान्य वर्तन.उत्तरा दिव्यांग असल्याचे माहीत असूनही सूरजने तिच्याशी लग्न केले हे फक्त तिच्या वडिलांच्या संपत्तीच्या लोभापोटी. मोबाईल व टाॅवरचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड.सर्पदंशाच्या खुणा असाधारण असल्याचा तज्ज्ञांचा अभिप्रायएकाच वेळी दोन दंशदोन्ही दंश जवळ जवळउत्तराचा मृत्यू रात्री २.३० वा. झाल्याचा अहवाल.नेहमीपेक्षा मोठा चावा. साधारणपणे वरच्या व खालच्या दातांच्या खुणात १ ते १.६ सें.मी. अंतर असते. पण येथे २.३ ते २.८ सें.मी. होते. म्हणजेच तोंड उघडून हाताजवळ नेले होते.सापाचा खोलीत नैसर्गिक प्रवेश नाही : सर्प तज्ज्ञांचा अहवालसाप स्वत:च्या लांबीच्या १/३ शरीर वर उचलतो. १५२ सें.मी. चा कोब्रा ५० सें.मी. शरीर वर उचलू शकतो.खोलीच्या खिडक्यांची उंची ११५ ते १२२ सें.मी. व्हेंटिलेटरची उंची २१० सें.मी.दरवाजात २ ते ४ मी.मी.ची फट. यातून कोब्रा जाणे अशक्य.कोब्रा कोणत्याही आधाराशिवाय भिंत, गुळगुळीत ड्रेनेज पाईपवर चढू शकत नाही.घोणस पायरी किंवा पलंगावर चढू शकत नाही. उत्तराच्या पायावर दंश झाला त्यावेळी ती पलंगावर होती.