शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अज्ञाताने पॉर्न वेबसाईटवर टाकला तरुणीचा मोबाईल नंबर अन्

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 2:24 PM

वैतागलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यामध्ये तरुणीचा मोबाइल नंबर पॉर्न वेबसाईटवर एका अज्ञाताने टाकला होता.अचानक तरुणीला अज्ञात व्यक्तींकडून व्हिडिओ कॉल आणि अनेक अश्लील मेसेज येऊ लागले. चंदीगड सेक्टर - ९ मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती.

चंदीगड - एका अज्ञात व्यक्तीने तीन पॉर्न वेबसाइटवर एका तरुणीचा मोबाइल नंबर टाकल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी ही एक कॉलेज विद्यार्थिनी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये तरुणीचा मोबाइल नंबर पॉर्न वेबसाईटवर एका अज्ञाताने टाकला होता. त्यानंतर अचानक तरुणीला अज्ञात व्यक्तींकडून व्हिडिओ कॉल आणि अनेक अश्लील मेसेज येऊ लागले. त्यामुळे तरुणी हैराण झाली होती. त्यानंतर वैतागलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पीडित तरुणीचा मोबाइल नंबर हा २३ सप्टेंबरला पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर तरुणीने २५ सप्टेंबरला पोलिसात तक्रार दाखल केली. तिने चंदीगड सेक्टर - ९ मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण चंदीगडच्या सायबर सेलमध्ये वर्ग करण्यात आली अशी पोलिसांनी माहिती दिली. मला व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट असणाऱ्या किमान ५० ते ६० लोकांनी व्हिडिओ कॉल आणि मेसेज केले आहेत. याबाबत अधिक माहिती काढली त्यावेळी माझा मोबाइल नंबर कुणीतरी पॉर्न वेबसाइटवर अपलोड केला असल्याची माहिती तरुणीने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांना एका संशयितांची ओळख पटली असून त्याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पुढे पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी