दुर्दैवी! रस्त्याने पायी जाणाऱ्या सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 06:17 PM2021-12-04T18:17:55+5:302021-12-04T18:18:33+5:30

Accident Case : ही घटना देऊळगाव गुजरीनजीक कापूसवाडी फाट्यावर शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. ही बालके देऊळगाव गुजरी येथील आहेत.

Unfortunately! The two of siblings walking on the road was crushed by a private bus | दुर्दैवी! रस्त्याने पायी जाणाऱ्या सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडले

दुर्दैवी! रस्त्याने पायी जाणाऱ्या सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडले

Next

जामनेर जि. जळगाव -  रस्त्याने पायी जाणाऱ्या सख्ख्या भावंडांना प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खासगी बसने चिरडले. यात आयान नसीब तडवी हा पाच वर्षीय बालक ठार तर त्याचा भाऊ रियान हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. ही घटना देऊळगाव गुजरीनजीक कापूसवाडी फाट्यावर शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. ही बालके देऊळगाव गुजरी येथील आहेत.  

बसचालक फहीम शाह मुश्ताक शाह व क्लिन्नर सरताज शाह मकसुद शाह  (रा. वाकडी ता. जामनेर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी बस (क्र.एम एच २१ बी.एच. ०६४७) ही  बुलढाणा ते जामनेर प्रवासी वाहतूक करते. शनिवारी सकाळी ही बस बुलढाण्याकडून जामनेरकडे येत होती. त्याचवेळी देऊळगाव गुजरी ता. जामनेरनजीक कापूस वाडी फाट्याजवळ आयान नसीब तडवी( ५) व रियान नसीब तडवी (७)  ही भावंडे रस्त्याने पायी जात होती. या बसने या भावंडांना चिरडले.  अपघात होताच जमलेल्या लोकांनी आयान तडवी याला बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय त्याला मृत घोषित करण्यात आले  तर रियान हा जखमी झाला आहे.

Web Title: Unfortunately! The two of siblings walking on the road was crushed by a private bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app