दुर्दैवी घटना! इमारतीच्या आवारात १३ वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 17:14 IST2019-01-17T17:12:50+5:302019-01-17T17:14:58+5:30
या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुर्दैवी घटना! इमारतीच्या आवारात १३ वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या
नालासोपारा - 13 वर्षाच्या शाळकरी मुलाने इमारतीच्या आवारातील पुलअप्स बारला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. हुजेफा अजगरली नागोरी असं या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. हुजेफाच्या आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट असून त्याच्या वहीत सापडलेल्या कागदामुळे संशयाचे काहूर माजले आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हुजेफाने नालासोपारा पूर्वेच्या रश्मी रेसिडेन्सी या इमारतीत कुटुंबासोबत रहात होता. तो जवळच असलेल्या सेंट विद्यामंदिर शाळेत 8 वी इयत्तेच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास त्याचा मृतदेह इमारतीच्या आवारात व्यायामासाठी असलेल्या पुल अप्सबारला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी हुजेफाच्या दप्तरातची तपासणी केली असता त्यात वहिची पाने सापडली आहेत. या पानावर हुजेफाने पंखा आणि त्याला एका दोरीला लटकलेल्या मुलाचे चित्र काढले आहे. तसेच 9.30 वाजता’ आणि ‘ए विंग’ असा उल्लेख या वहीच्या पानावर केला आहे. त्यामुळे हुजेफाने सुरुवातीला घरातील पंख्याला गळफास घेण्याचे ठरवले होते का? किंवा नंतर इमारतीच्या आवारात ए विंगसमोर आत्महत्या करण्याचे अगोदरच ठरवले होते का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे अवघ्या 13 वर्षाच्या हुजेफाने आत्महत्येची पूर्वयोजना आखली होती का? असे वेगवेगळे सवाल उपस्थित होत आहेत. त्याच्या दप्तरात संशयास्पद पान जरी सापडल असल तरी हुजेफाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.