मशीनमध्ये सापडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 18:33 IST2018-12-27T18:30:46+5:302018-12-27T18:33:22+5:30
साहेन मध्देसिया असं मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मशीनमध्ये सापडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई - गोरेगाव येथील वनराई परिसरातील शांता इंडस्ट्रिजमध्ये मशिनच्या दुरूस्ती दरम्यान एका ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे मशीनमध्ये अडकून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. साहेन मध्देसिया असं मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
गोरेगावच्या वनराई परिसरातील आर.बी.पटेल रोडवर शांता इंड्स्ट्रीज आहे. या माॅडटेक कंपनीत साहेन हा कामाला होता. बुधवारी कंपनीच्या मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे काम थांबले होते. कंपनीतील तज्ञ त्यावेळी मशीन दुरूस्तीचे काम करत असताना साहेन हा देखील त्यांना मदत करत होता. साहेन हा मशीनच्या आत असताना मशीन ऑपरेटरने अजाणतेपणी मशीन सुरू केली. त्यामुळे साहेन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ट्रामा रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी ऑपरेटरला अटक केली आहे.