Underworld don Arun Gawli's life sentence upheld by the High Court | अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची जन्मठेप हायकोर्टाने ठेवली कायम 
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची जन्मठेप हायकोर्टाने ठेवली कायम 

ठळक मुद्देडॅडीने या हत्येसाठी यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती.२०१२ मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला १४ लाख रुपयांचा दंड आकारत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.आज सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळत जन्मठेप कायम ठेवली.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीसह इतर आरोपींना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टाने आज कायम ठेवत आव्हान याचिका फेटाळली आहे. हायकोर्टाच्या न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. २ मार्च २००७ रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईतील घाटकोपरमधील असल्फा परिसरात हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. पोलिसांकडे तपासाअंती मारेकऱ्यांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच ही हत्या केल्याचं कबुल केले होते. 

डॅडीने या हत्येसाठी यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्काअंतर्गत २००८ साली डॅडीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. २०१२ मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला १४ लाख रुपयांचा दंड आकारत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच अन्य दहा आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, आज सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळत जन्मठेप कायम ठेवली.

English summary :
The Bombay High Court has rejected the plea which challenge the life sentence imposed on other accused, including underworld don Arun Gawli A.K.A. Daddy. For more detail about arun gawli check us at Lokmat.com.


Web Title: Underworld don Arun Gawli's life sentence upheld by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.