अनियंत्रित बस झाडावर धडकली; चालकासह १२ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 21:52 IST2021-07-14T21:50:24+5:302021-07-14T21:52:11+5:30
Accident : नागपूर-भंडारा रोडवर अपघात

अनियंत्रित बस झाडावर धडकली; चालकासह १२ प्रवासी जखमी
नागपूर (कामठी) : नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर सावळी बस स्टॉप नजीक हल्दीराम कंपनी समोर अनियंत्रित बस रस्त्याच्या कडलेल्या असलेल्या झाडावर धडकली. यात अपघातात एसटी चालकासह १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. बुधवारी ३.४५ वाजजा दरम्यान हा अपघात झाला. सर्व जखमींनी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार नागपूर-भंडारा-साकोलीला जाणारी एसटी बस क्रमांक एम.एच.४०-एन ९५६७ नागपूर येथून भंडाºयाकडे जात असताना नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर सावळी बस स्टॉप (हल्दीराम कंपनी) समोर चालकाचा स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडलेला असलेल्या मोठ्या झाडावर धडकली. यात चालकासह १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना भंडारा येथील जिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मौदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.