शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

काकानं भाचीवर केलेल्या दुष्कृत्याचा व्हिडीओ व्हायरल; सहा वर्षांपर्यंत केलं ब्लॅकमेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 09:21 IST

दिल्लीतल्या भजनपुरा भागात एक लाजिरवाणं कृत्य घडलं आहे.

नवी दिल्ली- दिल्लीतल्या भजनपुरा भागात एक लाजिरवाणं कृत्य घडलं आहे. काकानं 26 वर्षांच्या भाचीबरोबर दुष्कृत्य केल्याचं समोर आलं आहे. एवढ्यावरच न थांबता त्या नराधम काकानं पीडितेचा अश्लील व्हिडीओही तयार केला. या व्हिडीओच्या माध्यमातून तो पीडितेला ब्लॅकमेल करून तिचा वारंवार शारीरिक छळ करत होता. तो नराधम व्हिडीओ दाखवून तिच्यावर पाच ते सहा वर्षांपर्यंत लागोपाठ अत्याचार करत राहिला. काकाच्या शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेनं या दुष्कृत्याला वाचा फोडली आणि सर्व घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.  पोलिसांनी तपासानंतर 49 वर्षीय आरोपी असलेल्या काकाला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केला असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीनं आपण आपचा सदस्य असल्याचं सांगितलं. परंतु आम आदमी पार्टीनं आरोपीचा आमच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 26 वर्षीय पीडिता कुटुंबीयांसह भजनपुरा भागात राहते. तर आरोपी काका स्वतःच्या कुटुंबीयांसह सीलमपूरमध्ये राहतो.आरोपीचे पीडितेच्या घरी ये-जा होते. पाच ते सहा वर्षांपूर्वी पीडितेला फिरायला नेण्याच्या बहाण्यानं तो एका हॉटेलवर घेऊन गेला आणि तिकडेच त्यानं तिच्याबरोबर दुष्कृत्य केलं. त्याचदरम्यान त्याचा अश्लील व्हिडीओसुद्धा तयार केला. या प्रकारानंतर आरोपी वारंवार पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर जोरजबरदस्ती करू लागला. हा त्रास असह्य झाल्यानं पीडितेनं घडलेली हकीकत कुटुंबीयांना सांगितली, त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली, पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली. 

टॅग्स :Molestationविनयभंग