खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईच्या पोटात खुपसला स्क्रू ड्रायवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 18:21 IST2021-07-19T18:19:50+5:302021-07-19T18:21:44+5:30
Son murdered mother : नेहमीप्रमाणे त्याने सोमवारी दुपारी देखील उर्मिलाकडे पैशाची मागणी केली.ते देण्यास तीने नकार दिला.यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली.

खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईच्या पोटात खुपसला स्क्रू ड्रायवर
कुमार बडदे
मुंब्राः खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून संतप्त झालेल्या मुलाने जन्मदात्या आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी मुंब्र्यात घडली. येथील रेतीबंंदर भागातील ४ नंबर मधील शिवनेरी परीसरातील एका चाळीत रहात असलेला विशाल अलजेधे हा काही कामधंदा करत नव्हता. तसेच खर्चासाठी तो आई उर्मिला हिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. यामुळे दोघांमध्ये नेहमी वादावादी होत होती.
नेहमीप्रमाणे त्याने सोमवारी दुपारी देखील उर्मिलाकडे पैशाची मागणी केली. ते देण्यास तीने नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. यामुळे संतप्त होऊन त्याने तीच्या पोटामध्ये स्क्रू ड्रायवर खुपसला. त्याचा घाव वर्मी बसल्यामुळे तीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. घरातून आरडोओरडा ऐकू आल्या नंतर शेजारी रहाणा-यांनी त्याच्या घराकडे धाव घेतल्यानंतर वरील घटना उघडकीस आली. दरम्यान विशाल याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मुंब्रापोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकमतला दिली.