कऱ्हाडला अभयारण्यानजीकच्या रिसॉर्टवर अश्लील डान्स; ६ तरुणींसह डॉक्टर, बडे व्यापारी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 08:50 IST2023-05-31T08:42:19+5:302023-05-31T08:50:31+5:30

पार्टीत नागपूर शहर आणि मौदा तालुक्यातील डॉक्टर, बडे व्यापारी

Umred- Obscene dance at a resort near Karhadla Sanctuary...; 18 people including 6 young women doctor, businessman are detained Nagpur Crime news | कऱ्हाडला अभयारण्यानजीकच्या रिसॉर्टवर अश्लील डान्स; ६ तरुणींसह डॉक्टर, बडे व्यापारी ताब्यात

कऱ्हाडला अभयारण्यानजीकच्या रिसॉर्टवर अश्लील डान्स; ६ तरुणींसह डॉक्टर, बडे व्यापारी ताब्यात

उमरेड : उमरेड-कऱ्हाडला- पवनी अभयारण्या शेजारी असलेल्या रिसॉर्टवर अश्लील डान्सचा अश्लाघ्य प्रकार मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उजेडात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या नागपूर पथकाने ही कारवाई करताच परिसरात  खळबळ उडाली आहे. याप्रकरणी १२ पुरुष आणि ६ तरुणी अशा एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले  आहे.

 उमरेड तालुक्यातील तिरखुरा शिवारात असलेल्या रिसॉर्टवर हा अश्लील नाचगाण्याचा धिंगाणा सुरू होता.

टायगर पॅराडाईज असे या रिसॉर्टचे नाव आहे. रिसॉर्टच्या एका शाही हॉलमध्ये अश्लील डान्स सुरू होता. दुसरीकडे या डान्सवर हवेत पैसे फेकल्या जात होते. वृत्त लिहिस्तोवर मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत एलसीबीची कारवाई सुरू होती. या कारवाईत नागपूर शहर आणि मौदा तालुक्यातील डॉक्टर, बडे व्यापारी आदींचा समावेश आहे.

Web Title: Umred- Obscene dance at a resort near Karhadla Sanctuary...; 18 people including 6 young women doctor, businessman are detained Nagpur Crime news