धरीला दुचाकींचा चोर, सोलापुरात तीन चोरट्यांकडून तब्बल २९ मोटरसायकली जप्त

By रूपेश हेळवे | Updated: September 3, 2022 18:41 IST2022-09-03T18:40:45+5:302022-09-03T18:41:37+5:30

सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

Two-wheeler thief in Dhari, as many as 29 motorcycles seized from three thieves in Solapur | धरीला दुचाकींचा चोर, सोलापुरात तीन चोरट्यांकडून तब्बल २९ मोटरसायकली जप्त

धरीला दुचाकींचा चोर, सोलापुरात तीन चोरट्यांकडून तब्बल २९ मोटरसायकली जप्त

सोलापूर : चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या चोराला अटक करत त्याच्याकडून २९ मोटर सायकली शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहेत. मच्छिंद्र भागवत जाडकर ( वय ३६, रा. सिंदवाडा, मोडनिंब), सचिन जालिंदर चव्हाण ( वय ३६, महावीर पथ, मोडनिंब, माढा), दत्तात्रय रावसाहेब शेळके ( वय २५, रा. अरण, माढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यातील २७ गाडी मालकांचा शोध लागला असून दोन गाडी मालकांचा शोध अद्याप सुरू आहे. एकूण आठ लाख ४५ हजार रुपये किमतीचे या मोटरसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सपोनि दादासो मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 

Web Title: Two-wheeler thief in Dhari, as many as 29 motorcycles seized from three thieves in Solapur