थोड्या वेळासाठी दिलेले वाहन पळविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:01 IST2019-09-18T16:00:13+5:302019-09-18T16:01:10+5:30
विश्वास संपादन करून थोड्या वेळासाठी दिलेली चारचाकी घेऊन पोबारा केला...

थोड्या वेळासाठी दिलेले वाहन पळविले
हिंजवडी : विश्वास संपादन करून थोड्या वेळासाठी दिलेली चारचाकी घेऊन पोबारा केला. ही घटना शनिवारी (दि. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास डांगेचौक ते भुमकर चौक रस्त्यावर घडली. फसवणूक केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नवनाथ जिभाऊ पवार (वय २४, रा. सिडको, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभाष श्रावण बंजारा (रा. नागपूर) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
फियार्दी नवनाथ हे प्रतिभा मोटर्स कंपनीमध्ये नोकरीस असून त्यांच्या ओळखीचे असलेले सुभाष खैरनार यांची चारचाकी आरोपी बंजारा यांना थोड्यावेळासाठी दिली असता आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून चारचाकी घेऊन पोबारा केला. वाकड पोलीस तपास करत आहेत.