अज्ञात वाहनाच्या घडकेने जखमी दुचाकी चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 16:05 IST2019-08-02T16:00:10+5:302019-08-02T16:05:38+5:30
चिंचवडच्या केएसबी चौकात हा अपघात झाला होता.

अज्ञात वाहनाच्या घडकेने जखमी दुचाकी चालकाचा मृत्यू
पिंपरी : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. चिंचवडच्या केएसबी चौकात २३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला होता. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देविदास कांबळे (वय ३२) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी नागेश देविदास कांबळे (वय २३, रा. सावरगाव, ता. जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. नितीन कांबळे दि. २३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामावरून सुटून दुचाकीवरून जात होते. पिंपरी येथून टेल्को रोडने केएसबी चौकाकडून साने चौकाकडे जात होते. त्यावेळी केएसबी चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात कांबळे आणि त्यांच्यासोबत दुचाकीवर पाठीमागे बसलेला आणखी एकजण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा चालक अपघातस्थळी न थांबता तसेच पोलिसांना खबर न देता निघून गेला. जखमी कांबळे यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.