गजब! दोन बहिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, मग घरातून गेल्या पळून अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 19:32 IST2022-05-24T19:30:58+5:302022-05-24T19:32:39+5:30
Two sisters fell in love : एका मुलीने आत्याच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्यानंतर दोन्ही बहिणी सुखाने वैवाहिक जीवन जगत होत्या.

गजब! दोन बहिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, मग घरातून गेल्या पळून अन्...
नवी दिल्ली: ग्रेटर नोएडातील दनकौर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दोन लेस्बियन (समलैंगिक) बहिणींनी पळून जाऊन लग्न केले. घरातून हरवलेल्या मुलींच्या शोधात दिल्ली आणि नोएडा पोलिसांनी दोघींनाही एकाच ठिकाणाहून बाहेर काढले, तेव्हा ही बाब उघडकीस आली. एका मुलीने आत्याच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्यानंतर दोन्ही बहिणी सुखाने वैवाहिक जीवन जगत होत्या.
घरच्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी दोघींना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनी कोणाचेही ऐकले नाही. पोलिसांनी दोघींना वेगवेगळ्या नातेवाईकांकडे पाठवले. त्याचवेळी, पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणात सांगितले की, 20 एप्रिल रोजी दानकौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात कुटुंबीयांनी मुलीच्या हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्याचदिवशी दिल्लीतील आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या हरवलेल्या मुलीच्या आत्याची मुलगी देखील बेपत्ता झाल्याचे तपासात समोर आलं. पोलीस त्या मुलीचाही शोध घेत होते. दिल्ली आणि दनकौर पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका सोसायटीत शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर दोघींना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
क्राइम :बहिणीचा दीर निघाला दगेबाज; लग्न केलं, हनीमूनही केला आणि झाला फरार
चौकशीदरम्यान दोघांनी सांगितले की, त्यांनी दिल्लीतील एका मंदिरात एकमेकांशी लग्न केले आणि एकत्र राहू लागल्या. नातेवाइकांनी या दोघींना खूप समजावून सांगूनही त्यांनी ऐकले नाही. यानंतर पोलिसांनी त्याला दुसऱ्या नातेवाईकाच्या घरी पाठवले.