बहिणीचा दीर निघाला दगेबाज; लग्न केलं, हनीमूनही केला आणि झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 06:37 PM2022-05-24T18:37:47+5:302022-05-24T18:42:12+5:30

Groom absconding after first night of marriage : पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आता पती आणि सासरचे लोक हुंडा मागत आहेत. दोन लाख रुपये रोख व दुचाकी घेऊन देण्यास  नकार दिल्याने  विवाहित तरुणाने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Groom absconding after first night of marriage in chhapra | बहिणीचा दीर निघाला दगेबाज; लग्न केलं, हनीमूनही केला आणि झाला फरार

बहिणीचा दीर निघाला दगेबाज; लग्न केलं, हनीमूनही केला आणि झाला फरार

googlenewsNext

छपरा : सारण जिल्ह्यातील तरैया पोलीस स्टेशन परिसरात एक तरुणी आपल्या बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली. पण बहिणीचा दीर गद्दार निघाला. दोघांच्या प्रेमाची सर्वांना माहिती मिळाल्यावर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने मंदिरात लग्न केले. लग्नाची पहिली रात्र होती. हनिमून साजरा केल्यानंतर नववराने चकमा देऊन पळ काढला. यानंतर तरुणाने पत्नीला सोबत ठेवण्यासही नकार दिला. आता पीडितेने याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आता पती आणि सासरचे लोक हुंडा मागत आहेत. दोन लाख रुपये रोख व दुचाकी घेऊन देण्यास  नकार दिल्याने  विवाहित तरुणाने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे.

गेल्या दीड वर्षापासून बहिणीच्या दुरवर प्रेम होते
घटना तरैय्या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावातील आहे. पीडितेने तिच्या वडिलांसह पोलीस ठाणे गाठून न्यायाची याचना केली. गोपालगंज जिल्ह्यातील बरौली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या दिरावर तिचे गेल्या दीड वर्षांपासून प्रेम असल्याचे पीडितेने सांगितले. दोघे भेटले तेव्हा पती-पत्नीसारखे एकमेकांसोबत राहत होते. एके दिवशी 14 एप्रिलच्या रात्री बहिणीचा दीर तिला भेटायला तिच्या घरी आला. तेव्हा काही ग्रामस्थांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर स्थानिक सरपंच आणि मुख्याध्यापकाच्या अध्यक्षतेखाली गावातील लोकांनी दोघांचे लग्न करायचे ठरवले.

दोन्ही कुटुंबीयांच्या इच्छेने 15 एप्रिल रोजी मंदिरात हा विवाह पार पडला
पीडितेने सांगितले की, १५ एप्रिल रोजी आम्हा दोघांच्या संमतीने गावकऱ्यांनी मंदिरात लग्न केले. आम्ही दोघे नवरा-बायको म्हणून घरी आलो. तेव्हा आई म्हणाली आज रविवार आहे. उद्या सोमवारी पाठवणी केली जाईल. त्यानंतर रविवारी रात्री आम्ही दोघे डुमरी छपिया येथे एकत्र राहिलो. सोमवारी, 16 एप्रिल रोजी सकाळी हा मुलगा शौचाच्या बहाण्याने पळून गेला. मग माझे वडील मुलाच्या घरी गेले, माझे सासरे म्हणाले की, जरा थांबा, घोडा आणि गाडी घेऊन बँडसोबत पाठवणी केली जाईल.

आता सासरचे लोक हुंडा मागत आहेत
पीडितेने सांगितले की, 24 एप्रिल रोजी वर, त्याचे वडील, सासू, वहिनी आणि इतर लोक घरी आले आणि वडिलांना सांगितले की, आम्हाला 2 लाख रुपये रोख आणि हुंड्यात एक दुचाकी हवी आहे. त्यानंतर पाठवणी करून मुलीला आमच्या घरी नेऊ. नाहीतर घेऊन जाणार नाही. आता पीडित मुलगी आणि तिचे वडील दारोदारी भटकत आहेत. या प्रकरणामध्ये आता पीडितेने आणि तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात न्यायाची मागणी केली आहे.

 

Web Title: Groom absconding after first night of marriage in chhapra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.