दोन गुप्त खोल्या सापडल्या 'त्या' ऑर्केस्ट्रा बारमध्ये; बारबालांना लपवण्यासाठी केली होती सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 02:15 PM2021-12-10T14:15:18+5:302021-12-10T14:15:59+5:30

Secret Rooms in Orchestra Bar : पोलिसांनी ४ बारबाला, ३ गायक-वादक आणि ८ कर्मचारी अश्या एकूण १५ जणांना पकडले होते.

Two secret rooms were found in 'that' orchestra bar; Facilities were made to hide the bargirls | दोन गुप्त खोल्या सापडल्या 'त्या' ऑर्केस्ट्रा बारमध्ये; बारबालांना लपवण्यासाठी केली होती सोय

दोन गुप्त खोल्या सापडल्या 'त्या' ऑर्केस्ट्रा बारमध्ये; बारबालांना लपवण्यासाठी केली होती सोय

Next

मीरारोड - काही दिवसां पूर्वीच पोलिसांनाधाडीत केवळ ५४० रुपये सापडले होते त्या वादग्रस्त यश ९ ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांना लपण्यासाठी दोन गुप्त खोल्या आढळून आल्या. निवासी सदनिकेत चालणाऱ्या ह्या बारमधील पोलीस व पालिकेच्या कारवाईत गुप्त खोल्यांसह वाढीव बांधकाम तोडण्यात आले.

मीरारोडच्या शीतल नगर येथे यश ९ नावाने ऑर्केस्ट्रा बार चालतो . तळ मजल्यावर गाळा आणि पहिल्या मजल्यावरील सदनिकेचे रूपांतर बार मध्ये केले गेले आहे . आत मध्ये विविध प्रकारे बेकायदा बांधकाम केले गेले आहे.

२९ नोव्हेंबरच्या रात्री अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या सहाय्यक निरीक्षक तेजश्री शिंदे व पथकाने ह्या ऑर्केस्ट्रा बार वर छापा मारला होता. त्यावेळी पोलिसांनी ४ बारबाला, ३ गायक - वादक आणि ८ कर्मचारी अश्या एकूण १५ जणांना पकडले होते.

पोलिसांना छाप्यात केवळ २० रुपयांच्या नोटा मध्ये ५४० रुपयांची रोकड सापडली . बारबालांना नाचवले जात असताना देखील पोलिसांनी जुजबी कलमे लावली होती . त्यावरून पोलिसांनी थातुर मातुर कारवाई दाखवल्याची टीका सुरु झाली .

त्याची वरिष्ठांनी दखल घेत यश ९ बार मधील बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पालिकेस सांगण्यात आले . गुरुवारी सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप ह्यांच्या उपस्थतीत महापालिकेने बार मधील अंतर्गत बेकायदा बांधकामांवर कारवाई केली .

आश्चर्य म्हणजे १० दिवसां पूर्वी ज्या पोलिसांना केवळ ४ बारबाला सापडल्या होत्या त्याच बार मध्ये बारबालांना लपण्यासाठी बनवलेल्या २ छुप्या खोल्या गुरुवारी कारवाई वेळी आढळून आल्या . ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांना लपवण्यासाठी गुप्त - छुप्या खोल्या बनवल्या जात असून धाड पडली कि बारबालांना त्या छोट्याश्या खोलीत दाटीवाटीने कोंडून लपवले जाते .

यश ९ बारमध्ये गुरुवारी कारवाई वेळी पहिल्या मजल्यावर शौचालया जवळ एक गुप्त खोली सापडली . तर बारच्या लगत असलेल्या सदनिकेत जाणारी आणखी एक गुप्त खोली सुद्धा सापडली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हातोडे , पारई च्या सहाय्याने आतील बेकायदा वाढीव भिंती , पार्टीशन व गुप्त खोल्या तोडल्या.

कारवाई वेळी सहाय्यक पोलीस आयुक्तांसह पालिका उपायुक्त मारुती गायकवाड , उपायुक्त तथा प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण , प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड , चंद्रकांत बोरसे तसेच काही कनिष्ठ अभियंता , कर्मचारी, सुरक्षा रक्षक , पोलीस आदी उपस्थित होते . या बेकायदा बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करून ऑर्केस्ट्रा बार बंद करण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांनी केली आहे.

Web Title: Two secret rooms were found in 'that' orchestra bar; Facilities were made to hide the bargirls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.