दारू पिऊन धिंगाणा घालणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित, प्रशासनाचा दणका

By जितेंद्र ढवळे | Updated: October 13, 2023 22:22 IST2023-10-13T22:19:40+5:302023-10-13T22:22:13+5:30

हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र नागरे, वाहनचालक रवी साठवणे अशी या दोन निलंबित कर्मचाऱ्यांची नावे

Two policemen suspended for drunken misbehavior, administration slapped | दारू पिऊन धिंगाणा घालणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित, प्रशासनाचा दणका

दारू पिऊन धिंगाणा घालणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित, प्रशासनाचा दणका

भिवापूर: दारूच्या नेशत तर्र होऊन पोलिस स्टेशनच्या आवारातच एकमेकांना शिव्या घालत मारहाण करणाऱ्या दोन्ही पोलिसांनानागपूर ग्रामीणचे पोलिस अधिकीषक हर्ष पोद्दार यांनी निलंबित केले आहे. हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र नागरे व वाहनचालक रवी साठवणे, अशी या निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

बुधवारी (दि.११) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शैलेंद्र नागरे नेहमीप्रमाने दारू पिऊन वाहनचालक रवी साठवणे याला अश्लील शिवीगाळ करीत होता. या नेहमीच्या प्रकारामुळे संतापलेल्या रवीने त्याच्या कानशिलात लगावली. पुढे दोघांत मारामारी झाली. यावेळी रवीसुद्धा नशेतच होता. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात ‘दारूच्या नशेत तर्र अन् शिव्यांच्या लाखोल्या!’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करताच, पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत, दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

-
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, याबाबत चौकशी करण्याचा आदेश उमरेडच्या पोलिस निरीक्षकांना दिला आहे.

-हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण

Web Title: Two policemen suspended for drunken misbehavior, administration slapped