कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: August 23, 2025 01:01 IST2025-08-23T01:00:50+5:302025-08-23T01:01:36+5:30

कारवाईमध्ये एका निलंबित कर्मचाऱ्याचा समावेश; पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले निर्देश

Two police personnel from Thane headquarters who let prisoners go free dismissed, orders from Police Commissioner | कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदींना औषधोपचारासाठी कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना तिथून बाहेर खासगी वाहनाने हॉटेलात मद्य पार्टीसाठी जाण्याला मोकळीक देणाऱ्या ठाणे शहर मुख्यालयातील (सध्या निलंबित) पोलिस हवालदार गिरीष पाटील आणि पोलिस हवालदार योगेश शेळके या दोघांना शासकीय सेवेतून बडतर्फीची कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शुक्रवारी केली आहे.

कारागृहातील सात कैद्यांना ठाणे पोलिस मुख्यालयामधील सध्या निलंबित असलेल्या गंगाराम घुले यांच्यासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांनी ४ ऑगस्ट २०२५ रोजी रुग्णालयात औषधोपचारासाठी नेले होते. यावेळी सातपैकी फसवणूकीतील रमेशभाई पांबर आणि करण ढबालीया यांना चक्क एका रिक्षातून बाहेर हॉटेलात जेवणासाठी आणि मौजमजेसाठी बाहेर नेत  ‘व्हीआयपी’ सेवा पुरविल्याची बाब मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्या अचानक तपासणीत उघड झाली.

यातूनच घुले यांच्यासह नऊ जणांना पहिल्या कारवाईत तर शिवाजी गर्जे आणि दत्तात्रय जाधव या दोघांना दुसऱ्या कारवाईत उपायुक्तांनी निलंबित केले होते. त्यानंतर उपायुक्तांच्या अहवालाच्या आधारेच निलंबित केलेल्या ११ पैकी  गिरीश पाटील या हवालदारासह रतन शेळके या आणखी एका पोलिस हवालदाराला थेट शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे वर्तन हे गुन्हेगारांना मदत करणारे तसेच गुन्हेगारी वृत्तीस चिथावणी देऊन जनमानसातील पोलिसांची प्रतिमा असंतोषाची  आणि अविश्वासाची निर्माण करणारी त्याचबरोबर अशोभनीय आहे. त्यामुळे अशा वर्तनाने जनसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाल्याने ही कारवाई केल्याचे आयुक्तांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.

Web Title: Two police personnel from Thane headquarters who let prisoners go free dismissed, orders from Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.