अवघ्या दीड तासाच्या अंतराने दोन हत्या; फ्रेजरपुरा, आदर्शनगरात रक्तरंजीत थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 22:53 IST2021-08-12T22:53:11+5:302021-08-12T22:53:49+5:30
Crime News : पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी तातडीने अधिनस्थ यंत्रणेला दिशानिर्देश दिलेत.

अवघ्या दीड तासाच्या अंतराने दोन हत्या; फ्रेजरपुरा, आदर्शनगरात रक्तरंजीत थरार
अमरावती : जुलैचा तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात एक दिवसाआड खुनाच्या तीन घटना घडल्या. त्या घटनांची शाई वाळते न वाळतेच गुरुवारी लागोपाठ दोन खून झालेत. फ्रेजरपुरा येथे दुपारी १२ च्या सुमारास जुन्या वैमनस्यातून अनिकेत कोकणेला संपविण्यात आले.
पोलीस यंत्रणा फ्रेजरपुरा हद्दीत लागोपाठ घडलेल्या तिसऱ्या खुनामुळे ‘टेन्शन’मध्ये आली असताना, राजापेठ हद्दीतील आदर्शनगर भागात पतीने पत्नीचा खून केल्याची घटना उघड झाली. मोबाईल घेण्याच्या वादातून अवघ्या ११ महिन्यांपूर्वी विवाहबध्द झालेल्या नवविवाहितेचा पतीनेच गळा आवळला. दीड तासाच्या अंतराने हत्येच्या दोन घटना घडल्याने त्या परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी तातडीने अधिनस्थ यंत्रणेला दिशानिर्देश दिलेत.