मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 23:43 IST2019-02-07T23:43:20+5:302019-02-07T23:43:36+5:30
रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांचे मोबाईल चोरून करून पोबारा करणाºया दोन जणांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक
रांजणगाव गणपती : येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांचे मोबाईल चोरून करून पोबारा करणाºया दोन जणांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.
सोहेल शकील काझी (वय २१), सुरज शशीकांत चव्हाण (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील एका कंपनी समोरुन अमर बालाजी लगड हे कामावरुन घरी पायी जात असताना दुचाकीवरुन तीन अनोळखी आरोपींनी येऊन लगड याला मोबाइल कॉल करण्यासाठी विश्वासात घेऊन त्यांचा मोबाईल मागीतला. यानंतर हे तिघे त्यांचा फोन घेऊन पसार झाले.
या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरूर येथील जिजामाता उद्यान येथून सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत गुन्हा अन्वेषण विभागाचे दत्तात्रय गिरमकर, पोपट गायकवाड, राजू मोमीन, विनायक मोहिते, चमन शेख आदी पोलिस सहभागी झाले होते.
या आरोपींना पुढील कारवाईकरिता रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक घनवट यांनी सांगितले.