देवळीच्या महालक्ष्मी स्टील प्रकल्पाच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 16:26 IST2021-09-29T16:25:41+5:302021-09-29T16:26:32+5:30
Blast in Mahalakshmi Steel Plant : पोलीस सूत्रानुसार बुधवारला सकाळची शिफ्ट सुरू झाल्यानंतर स्टील कारखान्याच्या तीन नंबरच्या भट्टीत एकाएकी ब्लास्ट झाला.

देवळीच्या महालक्ष्मी स्टील प्रकल्पाच्या भट्टीत ब्लास्ट होऊन दोन जखमी
देवळी(वर्धा) : औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी स्टील कारखान्यातील तीन नंबरच्या भट्टीत ब्लास्ट होऊन यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले. बुधवारचे सकाळी ८ वाजताचे दरम्यान ही घटना घडली.
पोलीस सूत्रानुसार बुधवारला सकाळची शिफ्ट सुरू झाल्यानंतर स्टील कारखान्याच्या तीन नंबरच्या भट्टीत एकाएकी ब्लास्ट झाला. यावेळी भट्टीतील लोखंडाचा तप्त रस बाहेर फेकल्या गेल्याने यामध्ये कंपनीचे कामगार नरेंद्र सत्यदेव सिंग व अजयकुमार यादव जखमी झाले. यातील जखमी यादव ला नागपुर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असून दुसऱ्यावर सावंगी रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. या कारखान्यात लोखंडाचे मोठया प्रमाणातील उत्पादन होत असल्याने अपघाताच्या घटना नेहमीच्या झाल्या आहे.