नाशिकमध्ये दोन अवैध मद्यविक्री अड्ड्यांवर छापे; देशी मद्याचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 15:25 IST2023-05-16T15:24:31+5:302023-05-16T15:25:26+5:30
गुन्हे शोध पथकाची कारवाई : देशी मद्याचा साठा जप्त

नाशिकमध्ये दोन अवैध मद्यविक्री अड्ड्यांवर छापे; देशी मद्याचा साठा जप्त
संजय शहाणे
नाशिक : शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधक पथकाने राजीवनगर वसाहतीत दिवसा व रात्री दोन ठिकाणी छापा मारून सुमारे ३ हजार ५३५ रुपये किमतीच्या १०१ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी (दि. १५) राजीवनगर वसाहतीत अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू विक्री अड्ड्यावर दुपारी एक वाजेच्या सुमारास गुन्हे शोधक पथकाचे सागर परदेशी, मुश्रीफ शेख, युवराज पाटील, योगेश जाधव, वसंत ढगे यांनी छापा मारला. यावेळी संशयित गणेश किसन काऊतकर (४८, राजीवनगर वसाहत) याच्याकडे २६ संत्रा देशी दारूच्या बाटल्या सुमारे ९०० रुपये किमतीच्या आढळून आल्याने जप्त त्या जप्त करण्यात आल्या. तर रात्री एस. एम. साळी, प्रभाकर पवार, प्रकाश नागरे, मुकेश ढवळे यांनी केलेल्या कारवाईत बाबासाहेब रंगनाथ वाशिंबे (५७, राजीवनगर वसाहत) यांच्याकडून ७५ संत्रा देशी दारूच्या बाटल्या सुमारे २ हजार ६२५ रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.