शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत दोन ठिकाणी भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर पाचजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 21:46 IST

कांदिवली येथील अपघातमध्ये एका वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार झाले.

ठळक मुद्देदोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. अब्दुल आणि खालिदा यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर इतर जखमींवर उपचार सुरु आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी रात्री एका वाहनचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली.

मुंबई - मुंबईत मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. सायन पुलावर भरधाव टेम्पोने तीन दुचाकींना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी जखमी झाले. कांदिवली येथील अपघातमध्ये एका वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार झाले.सायन पुलावर मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी परवानगी आहे. मात्र मुंबईत येणाऱ्या वाहनांचा लोंढा वाढला तर पुलावरील एक लेन मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी सुरु करण्यात येते. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास टेम्पोचालक आदेश वानखेडे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो मुंबईकडे येणाऱ्या लेनमधील तीन दुचाकींना जाऊन धडकला. ही धडक इतकी भयंकर होती की, यामुळे दुचाकीवरील सर्वजण दूरवर फेकले गेले. इतर वाहनचालकांनी अब्दुल वाहिद मोहम्मद रोशन,  खालिदा अब्दुल वाहिद, अब्बास अली शेख, बादशाह मयुद्दीन, उमेश सहानी आणि एका महिलेला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र अब्दुल आणि खालिदा यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर इतर जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान टेम्पोचालक वानखेडे याला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी रात्री एका वाहनचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अनिल वाघेला आणि सागर पटेल या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. वाघेला आणि पटेल हे दोघेजण बोरिवली पूर्वेकडील पांडे कंपाउंडमधील रहिवाशी होते. वाघेला आणि पटेल हे घरी परतत असताना हा अपघात घडला. मात्र, त्यांना कोणत्या वाहनाने धडक दिली याचा शोध समतानगर पोलीस घेत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल